Join us

बोल्ड आणि बिनधास्त राखी सावंतचा एमएमएस झाला लिक

By admin | Updated: March 11, 2017 22:21 IST

राखी सांवतपूर्वी राधिका आपटे, नेहा महाजन या अभिनेत्रींचा एमएमएस लीक झाला होता.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - बोल्ड आणि बिनधास्त गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या हॉट व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.  कपडे बदलत असतानाचा राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे राखी बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. 

आतापर्यंत राखी सावंतकडून या व्हिडीओशी संबंधित कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे फटकळ बोलणारी राखी हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळणार हे बघणे मात्र मजेशीर ठरेल. चित्रपट मिळत नसल्यामुळे सध्या राखी इंडस्ट्रीमधून गायब आहे. परंतु या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, ज्यावेळी राखी सांवत इंडस्ट्रीमधून बाहेर असते तेव्हा अशीच काही तरी वादग्रस्तरीत्या तिची एंट्री होत असते. अर्थात ही एंट्री तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे होते. यावेळेस मात्र ती एमएमएस व्हिडीओमधून चर्चेत आल्याने तिचा हा व्हिडीओ कसा बाहेर आला, याविषयी सस्पेंन्स निर्माण झाला आहे. बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटीच्या शोच्या पहिल्या भागाची स्पर्धक राहिलेली राखीचा शेवटचा चित्रपट एक कहाणी जुली की मध्ये पहावयास मिळाली होती. त्यानंतर बऱ्याच म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. आता या व्हिडीओमुळे राखी पुन्हा लाइमलाइटमध्ये आली आहे.

राखी सांवतपूर्वी राधिका आपटे, नेहा महाजन या अभिनेत्रींचा  एमएमएस लीक झाला होता.