Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्नाचे फोटो झाले व्हायरल, त्यांनी केले का लग्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 17:54 IST

1 / 8
सोशल मीडियावर राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्नाचे फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होते आहेत. या फोटोंमध्ये नववधू प्रमाणे नटलेली दिशा आणि नवरदेव बनलेला राहुल वैद्य दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
आता राहुल आणि दिशाने स्वत: हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नवी सुरुवात असं कॅप्शन त्याने या फोटोसोबत लिहिलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
चाहत्यांनीे राहुल आणि दिशाच्या या फोटोवर अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच फॅन्स पेजवर हे फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
दोघांच्या चाहत्यांना थोडा वेळ धीर धरावा लागले कारण रिपोर्टनुसार हे फोटो रिअल लाईफमधले नसून रिल लाईफमधले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
राहुल आणि दिशाचा एक नवीन म्युझिक व्हिडिओ येत आहे. यात लग्नाचा सिक्वेन्स दाखवण्यात येणार असून यासाठी दोघांनी असा पोषाख घातला आहे. त्याच शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून गाण्याच्या शूटिंगसाठी दिशासोबत चंडीगढमध्ये आहे.
7 / 8
राहुलने काही दिवसांपूर्वी मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जेव्हा तो लग्न करेल तेव्हा ते जगाला सांगून करेल. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
राहुल आणि दिशाचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं.
टॅग्स :राहुल वैद्य