1 / 10बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती इंडस्ट्रीत बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. 2 / 10एका साउथच्या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिने एका सुपरस्टारला सणसणीत सपराकदेखील मारली आहे. एका मुलाखतीत राधिका आपटेने याचा खुलासा केला. तिने सांगितले की, त्या अभिनेत्याची वर्तणूक अशी होती की जी पाहून तिचा संताप अनावर झाला आणि ती स्वतःला थांबवू शकली नाही.3 / 10एका तमीळ सिनेमात काम करत असताना हा प्रसंग घडला होता. या कार्यक्रमात ती म्हणाली, सेटवर माझा पहिला दिवस होता. पण एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुदल्या करण्यास सुरुवात केली. मला धक्का बसला.4 / 10सिनेमाच्या आधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो. तरीही तो अभिनेता असा प्रकार कसा काय करु शकतो? मी त्याच वेळी त्याला थोबाडीत मारली, असं राधिका आपटेने सांगितले. राधिकाने हा किस्सा नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये सांगितला होता.5 / 10२००५ मध्ये राधिकाने वाह, लाईफ हो तो ऐसी या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर शोर इन द सिटी, कबाली, बदलापूर, मांझी- द माऊंटेन मॅन अशा अनेक चित्रपटांत राधिका दिसली आहे.6 / 10हिंदी चित्रपटांशिवाय राधिकाने मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटातही काम केले आहे. राधिकाला खरी ओळख शोर इन द सिटीमधून मिळाली आहे.7 / 10राधिका आपटेचा ओके कंप्यूटर ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली आहे.8 / 10राधिकाने नुकतीच 'मिसेस. अंडरकव्हर' या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले9 / 10याशिवाय राधिका घोल या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. 10 / 10राधिकाचे इंस्टाग्रामवर ३.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.