Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राच्या त्या टी-शर्टमुळे चाहते नाराज

By admin | Updated: October 10, 2016 19:27 IST

भारताला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेऊन पोचवणाऱ्या देसी गर्ल प्रियंका चोप्राविषयी सर्वांना अभिमान वाटतो पण चाहते तिच्यावर सध्या टीका करताना दिसत आहेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - भारताला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेऊन पोचवणाऱ्या देसी गर्ल प्रियंका चोप्राविषयी सर्वांना अभिमान वाटतो पण चाहते तिच्यावर सध्या टीका करताना दिसत आहेत. याचे कारण तिने घातलेल्या टी-शर्टवरील चार शब्द आहेत. या टी शर्टवर तीचे सौंदर्य अधिक खुलले आहे. पण त्या शब्दामुळे चाहत्यांनी तिच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करत तिच्या वर टीका केली आहे. 

प्रियंकाने Conde Nast Traveller  या मासिकासाठी फोटोशुट केले होते. याची माहिती तिने एका ट्विटद्वारे आपल्या चाहत्यांना दिली. फोटो शुटवेळी तिने घातलेल्या टी शर्टवर चार शब्द लिहले होते. शरणार्थी (Refugee), आप्रवासी (Immigrant), बाहरेली व्यक्ति (Outsider) आणि प्रवासी (Traveller) असे ते 4 होय. या चार शब्दपैकी पहिले तिन शब्द लाल रंगाने खोडले असून ट्रॅव्हलर या शब्दाला तसेच ठेवण्यात आले. यामुळे चाहते नाराज झाले. 

या चार शब्दांचा नेटीझन्स आपापल्या परिने अर्थ लावत असून प्रियांकाला यातून काय संदेश द्यायचा आहे, याबद्दल विचारणा करत आहेत. निर्वासितांना, अप्रवाशांना आणि बाहेरुन आलेल्यांवर बंदी घालण्याचा संदेश प्रियांकाला द्यायचा आहे का? अशा प्रतिक्रिया ट्विटरवर उमटत आहेत. तर काहींनी प्रियांका चुकीचा संदेश देत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात सोशल मिडियाच्या आधारे टीकाकारांना उत्तर दिले होते. मात्र फोटोवरुन उठलेल्या या टीकेवर देसी गर्ल प्रियांकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.