Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेक मालतीसोबत मेकअप करताना दिसली प्रियांका चोप्रा, शेअर केला क्यूट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 19:58 IST

1 / 7
बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची मुलगी मालती मेरीसोबत दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
या फोटोत मालती मेरी आई प्रियांका चोप्राच्या मांडीवर बसून तिच्या आईला मेकअप करताना पाहत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ग्लॅम विथ मम्मा'. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
प्रियांका चोप्राने 2018 साली हॉलिवूड अभिनेता गायक निक जोनाससोबत लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
जानेवारी २०२२ मध्ये प्रियांका आणि निक यांनी सरोगसीच्या मदतीने त्यांची मुलगी मालती मेरीचे या जगात स्वागत केले. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
प्रियांका चोप्रा सध्या तिच्या 'सिटाडेल' या वेब सीरिजमुळे खूप चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
Citadel चे पहिले दोन भाग 28 एप्रिल रोजी स्ट्रीम केले जातील, 26 मे पासून दर आठवड्याला एक नवीन भाग प्रदर्शित केला जाईल. ही मालिका अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास