Ponniyin Selvan : 500 कोटींच्या ‘पोन्नियिन सेल्वन’साठी ऐश्वर्याने घेतलं इतकं मानधन, पण नंबर 1 वर आहे सुपरस्टार विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 13:48 IST
1 / 10दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहेत. या चित्रपटावर मेकर्सनी तब्बल 500 कोटी खर्च केले आहेत. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा भाषेत रिलीज होणाऱ्या या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाची देखील सध्या चर्चा ऐकायला मिळतेय.2 / 10‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये प्रकाश राज यांनी सुंदर चोल यांची भूमिका साकारली आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, या भूमिकेसाठी त्यांनी सुमारे 1 कोटी मानधन घेतलं आहे.3 / 10मेड इन हेवन फेम अभिनेत्री शोभिता धुलीवाला यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. तिनेही या चित्रपटासाठी 1 कोटी चार्ज केले आहेत.4 / 10साऊथ स्टार ऐश्वर्या लक्ष्मी या चित्रपटात पुंगुझलीच्या भूमिकेत आहेत. तिने या चित्रपटासाठी 1.5 कोटी फी घेतल्याची चर्चा आहे.5 / 10तृषा कृष्णन ही या चित्रपटात कुदवईच्या राजकुमारीची भूमिका साकारते आहे. यासाठी तिने 2.5 कोटी रूपये फी घेतली आहे.6 / 10साऊथ स्टार कार्थी या चित्रपटात वल्लवरैयन वंदियादेवनच्या रोलमध्ये दिसणार आहे. यासाठी त्याने 5 कोटी रूपये मानधन घेतलं आहे.7 / 10तामिळ स्टार जयराम रवी पोन्नियीन सेल्वनच्या भूमिकेत आहेत. त्याने या चित्रपटासाठी 8 कोटी घेतल्याची चर्चा आहे.8 / 10साऊथ स्टार प्रभु पेरिया बूथी या सिनेमात विक्रम केसरीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने 1.25 कोटी रूपये घेतल्याची चर्चा आहे.9 / 10ऐश्वर्या राय या चित्रपटात डबल रोलमध्ये दिसार आहे. नंदिनी आणि सारा अशा दोन भूमिका ती साकारते आहे. यासाठी तिने 10 कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.10 / 10तामिळ सुपरस्टार चियान विक्रम हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याने या चित्रपटासाठी तब्बल 12 कोटी रूपये मानधन घेतल्याचं कळतंय. यात तो करिकालनच्या भूमिकेत दिसणार आहे.