Join us

PHOTOS: अभिनेत्री नेहा पेंडसे दिसणार 'सुरज पे मंगल भारी' चित्रपटात, दिवाळीला होणार रिलीज

By तेजल गावडे | Updated: October 14, 2020 17:15 IST

1 / 9
मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.
2 / 9
मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
3 / 9
अभिनेत्री नेहा पेंडसे सुरज पे मंगल भारी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीला रिलीज होणार आहे.
4 / 9
नेहाने सुरज पे मंगल भारी चित्रपटाचा पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, कृपया तुमची कुंडली तपासून पहा. लवकरच तुमच्या सर्वांच्या जीवनात, सुर्याचा प्रकोप आणि मंगळचा प्रभाव वाढणार आहे.१३ नोव्हेंबर. या दिवाळीला तयार रहा धमाकेदार फॅमिली एन्टरटेनरसाठी.
5 / 9
सुरज पे मंगल भारी चित्रपटात नेहा शिवाय अन्नू कपूर, सुप्रिया पिळगावकर, विजय राज, सीमा पाहवा, मनोज पाहवा, नीरज सूद, मनुज शर्मा, वंशिका शर्मा, करीश्मा तन्ना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
6 / 9
सुरज पे मंगल भारी चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्माने केले आहे.
7 / 9
या चित्रपटातील नेहाच्या भूमिकेबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही.
8 / 9
या व्यतिरिक्त नेहा जून या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
9 / 9
टॅग्स :नेहा पेंडसेसुप्रिया पिळगांवकरमनोज वाजपेयीकरिश्मा तन्ना