1 / 8परेश रावल यांच्या पत्नी स्वरूप संपत एक अभिनेत्री आहेत.2 / 8त्यांनी १९७९ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि मिस इंडियाचा किताब त्यांनी पटकावला आहे. त्याच वर्षी त्यांनी मिस युनिव्हर्स स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.3 / 8त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी ‘नरम गरम’ (१९८१), ‘हिम्मतवाला’ (१९८३), ‘करिष्मा’ (१९८४), ‘साथिया'(२००२), ‘सप्तपदी’ (२०१३) यासारख्या चित्रपटांत काम केले आहे. १९८४ मध्ये आलेल्या ‘करिष्मा’ चित्रपटांत त्यांनी बिकनी घालून सर्वांना थक्क केले होते.4 / 8त्यांनी ‘कि अँड का’ (२०१६) चित्रपटांत करीना कपूरच्या आईची भूमिका निभावली होती. कॉमेडी टीव्ही शो ‘ये जो है जिंदगी’ साठी त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करण्यास नकार दिला होता. परंतु त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. कारण ‘ये जो है जिंदगी’ हा टीव्ही शो खूपच लोकप्रिय झाला होता.5 / 8त्यांनी कुमकुम बनवणाऱ्या शृंगार कंपनीसाठी मॉडेलिंगसुद्धा केली आहे.6 / 8त्या आता दिव्यांग मुलांना अभिनय शिकवतात. आत्ताचे पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वरूप संपत ह्यांना मुलांसाठी असणाऱ्या एज्युकेशन विभागासाठी हेड म्हणून नियुक्त केले होते.7 / 8शिक्षिका आणि समाजसेवा व्यतिरिक्त त्या एक चांगल्या लेखिका सुद्धा आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.8 / 8त्यांना दोन मुले असून त्यांची नावे अनिरुद्ध आणि आदित्य आहेत.