Join us
Daily Top 2Weekly Top 5

Love Story : बॉसच्या मुलीच्याच प्रेमात पडले परेश रावल, म्हणाले, "हीच माझी बायको"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:11 IST

1 / 7
बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या आहेत ज्यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. अनेकांचा संसार आजही टिकून आहे तर काही जोड्या मात्र वेगळ्या झाल्या आहेत. असेच एक अभिनेते म्हणजे परेश रावल (Paresh Rawal) जे कोणत्याही भूमिकेत उठूनच दिसतात. खऱ्या आयुष्यातही त्यांना कमालीचा आत्मविश्वास होता ज्यामुळे त्यांची लव्हस्टोरी इंटरेस्टिंग बनली.
2 / 7
परेश रावल यांनी जरी सिनेमांमध्ये रोमँटिक भूमिका कधी केल्या नसल्या तरी खऱ्या आयुष्यात ते भलतेच रोमँटिक निघाले. परेश रावल आणि स्वरुप संपत (Swaroop Sampat) यांची लव्हस्टोरी ऐकून हे नक्कीच स्पष्ट होतं. स्वरुप संपत परेश रावल यांच्या बॉसची मुलगी होती. तिला बघताच क्षणी ते तिच्या प्रेमात पडले होते.
3 / 7
परेश रावल यांच्यासोबत त्यांचे मित्र महेंद्र जोशी होते. आम्ही जेव्हा स्वरुप संपत यांना पाहिलं तेव्हा मी लगेच म्हटलं की हीच मुलगी माझी बायको होणार. त्यावर महेंद्र मला म्हणाला, 'तुला माहितीये ना तू ज्या थिएटरमध्ये नाटक करतोय त्या थिएटर मालकाची ती मुलगी आहे.' मी म्हणालो, 'कोणाचीही मुलगी असो, बहीण असो, आई असो मी हिच्याशीच लग्न करणार.'
4 / 7
परेश रावल यांनी स्वरुप संपतला लग्नाची मागणी घातली. जवळपास १२ वर्ष सोबत राहिल्यानंतर त्यांनी 1987 साली दोघंही लग्नबंधनात अडकले. त्यांना आदित्य आणि अनिरुद्ध ही दोन मुलंही झाली.
5 / 7
परेश रावल आणि स्वरुप संपत यांचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने झालं होतं. त्यांच्या लग्नात साधा मंडपही घालण्यात आला नव्हता. एका झाडाखाली त्यांनी सात फेरे घेतले होते.
6 / 7
स्वरुप संपत या स्वत: अभिनेत्री होत्या. तसंच त्यांनी परदेशातून पीएचडी केली आहे. याशिवाय त्यांनी 1979 साली मिस इंडियाचा किताब पटकावला. त्याच वर्षी त्यांनी मिस युनिव्हर्समध्येही सहभाग घेतला होता.
7 / 7
स्वरुप यांनी 'नाखुदा' आणि 'नरम गरम' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच 'ये जो है जिंदगी' मालिकेतही काम केलं. आता रिलीज होणाऱ्या 'ओह माय गॉड 2' च्या त्या निर्मात्या आहेत.
टॅग्स :परेश रावलबॉलिवूडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टपती- जोडीदार