फक्त सैफ नाही तर नसीरुद्दीन शाहांसह या सेलिब्रिटींवर झालाय हल्ला; कुणाला भोसकले तर कुणावर झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:08 IST
1 / 7गुलशन कुमार - गुलशन कुमार यांनी आपल्या भक्तिगीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. १९९७ मध्ये, टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची अंधेरी येथे एका मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचे कारण म्हणजे त्यांनी अंडरवर्ल्डला प्रोटेक्शन मनी देण्यास नकार दिला होता.2 / 7सैफ अली खान- सैफ अली खानवर गुरुवारी रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात घुसून चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.3 / 7प्रिती झिंटा- प्रिती झिंटानेही अंडरवर्ल्डचा सामना करताना त्याने दाखवलेल्या धाडसाबद्दल तिचे कौतुक झालं होतं. २००१ मध्ये, 'चोरी चोरी चुपके चुपके' चित्रपटाच्या कायदेशीर खटल्यांदरम्यान, तिने बॉलीवूडमध्ये वापरण्यात येणाऱ्या अंडरवर्ल्डच्या पैशाच्या व्यवहारांबद्दल साक्ष दिली होती.५० लाख रुपये देण्याची धमकी दिल्याचे त्याने सांगितले होते. प्रिती अंडरवर्ल्ड आणि चित्रपट माफियांच्या निशाण्यावर आली होती.4 / 7राकेश रोशन- हृतिक रोशनचे वडील आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांच्यावर जानेवारी २००० मध्ये, दोन हल्लेखोरांनी सांताक्रूझ भागात त्यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडल्या होत्या. ज्यामध्ये ते थोडक्यात बचावले. राकेश रोशन यांनी खंडणीसाठी मागितलेली रक्कम न दिल्याने हा हल्ला अंडरवर्ल्डने केला होता असं म्हटले जाते.5 / 7सलमान खान- बॉलिवूडचा दबंग खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. गेल्या वर्षी सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर त्याची सुरक्षा वाय प्लस स्तरावर वाढवण्यात आली.6 / 7राजीव राय - दिग्दर्शक राजीव राय यांच्यावर अंडरवर्ल्डने हल्ला केला होता. त्यामुळे राजीव राय यांनी भारत सोडून ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. राजीव राय यांना अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमकडून धमक्या आल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सुरक्षाही दिली होती. एका संध्याकाळी राजीव राय कॉमर्स सेंटरच्या ऑफिसमधून निघाले होते. ५ हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. राजीव राय यांच्या अंगरक्षकांनीही प्रत्युत्तर दिले ज्यात एक हल्लेखोर जखमी झाला. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पण या हल्ल्याचा राजीव राय यांच्यावर इतका परिणाम झाला की ते देश सोडून कुटुंबासह ब्रिटनला गेले.7 / 7नसीरुद्दीन शाह- अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. एका पुस्तकामध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला आहे. नसीरुद्दीन शाह एका रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करत होते. त्यावेळी त्यांचा एक जुना मित्र अभिनेता जसपाल त्या रेस्टॉरंटमध्ये आला. नसीरुद्दीन शाह यांचे जसपालमध्ये आधीच काही मतभेद होते. त्यावेळी जसपालने माझ्या पाठीच्या मध्यभागी एक जोरदार ठोसा जाणवला. मी पुढे जाण्यापूर्वीच ओमने माझ्या मागे उभ्या असलेल्या जसपालवर हल्ला केला. मी मागे वळून पाहिलं तर जसपाल चाकू घेऊन उभा होता. चाकूच्या टोकातून रक्त वाहत होते. मी काही समजण्याआधीच त्याने पुन्हा हल्ला करण्यासाठी हात वर केला. मी पाहिले की ओम आणि इतर दोन लोक त्याला पकडले होते. यानंतर शाह यांना आधी कूपर आणि नंतर जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.