Join us  

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकारांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 11:52 AM

1 / 10
'हसताय ना? हसायलाच पाहिजे...' असं म्हणत 'चला हवा येऊ द्या' या झी वाहिनीवरील कॉमेडी शोमधूननिलेश साबळे घराघरात पोहोचला.
2 / 10
प्रेक्षकांना आपुलकीने 'हसताय ना?' असं विचारणारा निलेश साबळे आता त्याच नावाचा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3 / 10
कलर्स वाहिनीवरील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा नवा कोरा शो घेऊन निलेश साबळे पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
4 / 10
'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर आता निलेश साबळेने 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोमधून त्याची नवी इनिंग सुरू केली आहे.
5 / 10
निलेश साबळेच्या या नव्या कोऱ्या कॉमेडी शोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या शोसाठी त्याचे चाहतेही उत्सुक आहेत.
6 / 10
'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' मधील कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
7 / 10
या शोच्या प्रोमोमध्ये निलेश साबळेबरोबर भाऊ कदमही दिसले. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.
8 / 10
भाऊ कदमनंतर या शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदमची एन्ट्री झाली आहे.
9 / 10
'चला हवा येऊ द्या'मधून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता रोहित चव्हाणही निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये दिसणार आहे.
10 / 10
याबरोबरच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम हे कलाकारही 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोमध्ये झळकणार आहेत.
टॅग्स :निलेश साबळेचला हवा येऊ द्याकलर्स मराठीभाऊ कदम