Join us  

Wedding Album : मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कुलकर्णी! पाहा, विराजस व शिवानीच्या शाही लग्नाचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 12:34 PM

1 / 11
विराजस कुलकर्णी नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत विराजसने लग्नगाठ बांधली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हा लग्नसोहळा पार पडला. (all PHOTO- @rangshivani @weddingkraft)
2 / 11
या लग्नाची चर्चा अद्याप सुरू आहे. या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.
3 / 11
शिवानीनं लग्नाचे काही नवे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या शिवानी नववधुच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. लग्नमंडपातील शिवानीचा लुक वेड लावणारा आहे.
4 / 11
लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर विराजस व शिवानी यांनी लग्नमंडपात डान्स केला. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. सगळेच आनंदात आहेत.
5 / 11
लग्न म्हटल्यानंतर मज्जा येणारच. वरमालेसाठी विराजस व शिवानीला पाहुण्यांनी वर उचलून घेतलं, तो क्षण कॅमेºयात नेमका टिपला गेला आहे.
6 / 11
लग्नानंतर विराजस व शिवानी यांची ही दिलखुलास फ्रेम. निमित्त काय होतं माहित नाही. पण या फोटात नवरा-नवरी खळखळून हसत आहेत.
7 / 11
विराजस हा पारंपरिक सदरा-धोतर आणि लाल रंगाच्या उपरण्यात बोहल्यावर चढला. पारंपरिक पद्धतीने विराजस व शिवानीचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजक्या लोकांची उपस्थिती होती.
8 / 11
विराजस व शिवानी यांनी आपल्या लग्नात दाक्षिणात्य पेहराव केला होता. शिवानीने सुंदर कांजीवरम साडी नेसली होती. या साडीत ती कमालीची सुंदर दिसत होती.
9 / 11
लग्नानंतर विराजस व शिवानी यांनी खास फोटोशूट केलं. त्याचे फोटोही समोर आले आहेत. हा फोटो शिवानी व विराजस आयुष्यभर सांभाळून ठेवतील.
10 / 11
एकमेकांत हरवलेलं कपल. होय, हा फोटो पाहून असंच म्हणावं लागेल. या फोटोत विराजस शिवानीच्या डोळ्यांत हरवला आहे.
11 / 11
लग्न हा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. पारंपरिक पद्धतीने विराजस व शिवानीचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजक्या लोकांची उपस्थिती होती.
टॅग्स :विराजस कुलकर्णीशिवानी रांगोळेमृणाल कुलकर्णी