Join us  

पाहा, ‘सिस्टर्स गँग’सोबत नीती मोहनचे प्री-वेडिंग फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 1:38 PM

1 / 6
आपल्या मधुर आवाजाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी बॉलिवूड सिंगर नीती मोहनसुद्धा विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या याच्यासोबत नीती लग्नाच्या आणाभाका घेणार आहे.आपल्या जीवनातील हा खास सोहळा यादगार ठरावा यासाठी नीती मोहनने काही खास प्लॅनिंगही केले आहे. यापैकीचं एक म्हणजे, प्री वेडिंग फोटोशूट...
2 / 6
तूर्तास नीतीच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंत नीती आपनल्या तिन्ही बहिणींसोबत दिसतेय.
3 / 6
कृती मोहन, शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन या तिन्ही बहिणींसोबत नीतीचे हे फोटोशूट खास आहे. यात नीती धम्माल मस्ती करताना दिसतेय.
4 / 6
खरे तर प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये भावी पती-पत्नी करतात. पण नीती मोहनचे सिस्टर्स गँगसोबतचे हे फोटोशूट हटके म्हणरयला हवे.
5 / 6
उद्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंडाईन डेच्या दिवशीच लग्नाच्या प्री-सेलिब्रेशनला सुरूवात होणार आहे .
6 / 6
15 फेब्रुवारीला हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेस येथे पारंपरिक पद्धतीने नीती व निहार यांचे शुभमंगल पार पडणार आहे. तुर्तास लग्नसोहळ्याला नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मंडळींसह इंडस्ट्रीतील अनेक मान्यवरही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
टॅग्स :नीति मोहन