Join us
Daily Top 2Weekly Top 5

नच बलियेचे विजेते

By admin | Updated: July 20, 2015 00:00 IST

एका मालिकेत एकत्र काम करता करता ऋत्विक धनजानी आणि आशा नेगीची जोडी जमली. ऋत्विक स्वत: तर एक उत्तम डान्सर ...

एका मालिकेत एकत्र काम करता करता ऋत्विक धनजानी आणि आशा नेगीची जोडी जमली. ऋत्विक स्वत: तर एक उत्तम डान्सर आहेच. नच बलियेच्या ६व्या पर्वा आशानेही त्याला उत्कृष्ट साथ दिली आणि दोघांनी बहारदार परफॉर्मन्सेस देत हे पर्व जिंकले.

जय भानुशाली आणि माही विज ही टीव्ही इंटस्ट्रीमधील आणखी एक क्युट जोडी. चांगले अभिनेते असणा-या या दोघांनी नच बलियेचे पाचवे पर्व जिंकून आपण उत्कृष्ट डान्सर असल्याचेही सिद्ध केले.

शालीन भानोत आणि दलजित हे दोघे चौथ्या पर्वात विजयी ठरले.

उत्कृष्ट डान्सर असलेले टीव्ही स्टार आमिर अली व संजिदा शेखने उत्कृष्ट नृत्य करत तिस-या पर्वाच्या विजेतेपदावर नाव कोरले.

कुमकुम मालिकेतील भूमिकेमुळे लोकप्रिय ठरलेला चॉकलेट बॉय अभिनेता हुसैन कुवाजरवाला आणि त्याची सौंदर्यवती पत्नी टीनाने दुस-या पर्वाचे विजेतेपद पटकावले.

लोकप्रिय अभिनेते सचिन व सुप्रिया पिळगावकर यांनी या शोच्या पहिल्याच पर्वात विजेतेपदावर नाव कोरले होते. सचिन यांची दिलखुलास नृत्यशैली आणि त्यांना सुप्रिया यांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर त्या दोघांची जोडी विजेती ठरली.

मराठमोळी लावण्यवती अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचा बलिये हिमांशू म्हलोत्रासोबत नच बलिये या रिअॅलिटी शोच्या सातव्या विजेतेपद पटकावले. सचिन-सुप्रिया पिळगावकरनंतर या शोमध्ये बाजी मारणारी अमृता दुसरी मराठी कलाकार ठरली आहे. शोच्या पहिल्या टप्प्यापासूनच अमृता - हिमांशूच्या जोडीने दमदार नृत्यामुळे प्रेक्षक व परिक्षकांची वाहवा मिळवली होती.