Join us
Daily Top 2Weekly Top 5

अग्गंबाई सूनबाई! होणाऱ्या सूनेसोबत मृणाल कुलकर्णी यांनी केलं झक्कास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 14:58 IST

1 / 7
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लाडका लेक विराजस कुलकर्णी लवकरच बोहल्यावर चढणार आहे आणि मृणाल लेकाच्या लग्नासाठी सज्ज झाल्या आहेत. (सर्व फोटो- इन्स्टाग्राम)
2 / 7
होय, होणाऱ्या सूनबाईसोबतचे मृणाल यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. एका साडीच्या ब्रँडसाठी मृणाल व त्यांची होणारी सून शिवानी रांगोळे यांनी एक झक्कास फोटोशूट केलं.
3 / 7
या फोटोत शिवानी पिंक कलरच्या साडीत आहे तर मृणाल यांनी काळ्या रंगाची पिंक बॉर्डर असलेली साडी नेसली आहे.
4 / 7
सूनबाई आणि सासूबाई दोघीही फोटोत झक्कास दिसत आहेत. सध्या हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 7
विराजस आणि शिवानी येत्या मे महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नासाठी 7 मे रोजीचा मुहूर्त ठरला आहे.
6 / 7
सून कशी हवी? असा प्रश्न लोकमतच्याच एका मुलाखतीत मृणाल यांना विचारण्यात आला होता. यावर माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत, असं त्या म्हणाल्या होत्या.
7 / 7
विराजसला पूरक अशी, त्याला हवी तशी मैत्रिण त्याला मिळावी आणि ही मैत्रिण आमच्या घरात सून म्हणून यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे. विराजस जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही आनंदी असू, असंही त्यांनी सांगितलं होतं.
टॅग्स :मृणाल कुलकर्णीशिवानी रांगोळेविराजस कुलकर्णी