1 / 11बॉलिवूडमध्ये दर्जेदार चित्रपटांसह कलाकारांच्या पर्सनल लाइफचीही अनेकदा चर्चा रंगत असते. यात सध्या बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे ज्यांचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी आला होता.2 / 11एकेकाळी कलाविश्वातील काही अभिनेत्रींचं नाव दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. हे कुख्यात डॉन प्रसिद्ध अभिनेत्रींच्या प्रेमात पडल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे या अभिनेत्री कोण ते पाहुयात. तसंच सध्या त्या कशा दिसतात तेदेखील जाणून घेऊ.3 / 11मोनिका बेदी - अंडरवर्ल्डशी थेट संबंध येणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मोनिका बेदीचं नाव प्रथम घेतलं जातं. मोनिका बेदी आणि अबू सालेम यांची लव्हस्टोरी चांगलीच गाजली होती. 4 / 11अबू सालेमसाठी करिअर पणाला लावून मोनिका तुरुंगातही गेली होती. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही. मोनिकाचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र. आजही ती तिच्या ग्लॅमरसपणामुळे चर्चेत असते.5 / 11अनिता अयूब - दाऊद इब्राहिमसह अनिताचं नाव जोडलं गेलं होतं. अनिता फार मोजक्या चित्रपटांमध्ये झळकली. मात्र, दाऊदमुळेच तिला अनेक चित्रपट मिळाले.6 / 11सूत्रांच्या माहितीनुसार, जावेद सिद्दीकीने अनिताला त्याच्या चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. ज्यामुळे दाऊदने त्याची हत्या केली होती.7 / 11मंदाकिनी - बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. राम तेरी गंगा मैली या चित्रपटात बोल्ड सीन देऊन ती तुफान चर्चेत आली. मंदाकिनीच्या रुपावर दाऊद इब्राहिमदेखील भाळला होता.8 / 11मंदाकिनी आणि दाऊद यांना एका मॅच दरम्यान एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या रिलेशनची चर्चा सुरु झाली होती. मात्र, मंदाकिनीने कायम हे नातं मान्य करण्यास नकार दिला.9 / 11ममता कुलकर्णी - अल्पावधीत कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. परंतु, अभिनयापेक्षा ममता तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत आली.10 / 11 ममता कुलकर्णीचं नाव विकी गोस्वामीसोबत जोडलं गेलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, विकी आणि ममताने लग्नदेखील केलं होतं.इतकंच नाही तर तिचं नाव छोटा राजनसोबतही जोडलं गेलं होतं.11 / 11दाऊद इब्राहिमच्या आधी अंडरवर्ल्ड जगतात हाजी मस्तान हे नाव खूप मोठे होते. हाजी मस्तान व बॉलिवूड अभिनेत्री सोना यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. सोनासोबत लग्न करून तिच्यासोबत संसार थाटण्यासाठी हाजी मस्तान अंडरवर्ल्डचा डॉन बनला. त्यांची लव्हस्टोरी 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे.