Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या अभिनेत्रीने साउथच्या अभिनेत्याला सेटवर लगावली थप्पड, कंटाळली होती त्याच्या या वर्तणुकीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:35 IST

1 / 9
असं काय घडलं सेटवर की अभिनेत्रीने साउथच्या अभिनेत्याला थप्पड लगावली.
2 / 9
पॅडमॅन, मांझी द माउंटमॅन यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. राधिका आपटेनेच एका साउथ अभिनेत्याला थप्पड लगावली होती.
3 / 9
हा किस्सा त्यावेळीचा आहे जेव्हा अभिनेत्री एका तमीळ चित्रपटाचं शूटिंग करत होती. याचा उल्लेख तिने एका मुलाखतीत केला होता. तिने सांगितले होते की, एक दिवस मी सेटवर एका अभिनेत्याला थप्पड मारली होती.
4 / 9
राधिकाने सांगितले की, एक दिवस ती सेटववर शूटिंग करत होती तेव्हा त्या साउथ अभिनेत्याने अचानक तिच्या पायाला गुदगुद्या करायला सुरूवात केली आणि मला इतका राग आला की मी त्याच्या गालावर थप्पड दिली.
5 / 9
राधिकाने हादेखील खुलासा केला की, त्या अभिनेत्याला ती पहिल्यांदा भेटली होती आणि त्याला ओळखतपण नव्हती. त्यामुळे ती त्याची ही वर्तणूक सहन करू शकली नाही.
6 / 9
राधिका आपटेने अहल्या, बदलापूर, हंटर या सारख्या सिनेमात बरेच इंटिमेट सीन्स दिले आहेत. या चित्रपटानंतर तिला अनेक अॅडल्ट सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. या गोष्टीमुळे ती त्रस्त झाली.
7 / 9
राधिकाने आपटेने फक्त सिनेमातच नाही तर सेक्रेड गेम्स आणि घुल सारख्या वेबसीरिजमध्येही काम केले आहे.
8 / 9
अभिनयाच्या कारकीर्दीबद्दल सांगायचं तर राधिकाने तिच्या करिअरची सुरूवात २००५ साली रिलीज झालेल्या वाह लाइफ हो तो ऐसी या चित्रपटातून केली होती.
9 / 9
याशिवाय ती शोर इन द सिटी, रक्त चरित्र, द वेटिंग रूम आणि आई एम यासारख्या सिनेमात काम केले आहे. याशिवाय तिने तमीळ, तेलगू आणि मराठी सिनेमातही काम केले आहे.
टॅग्स :राधिका आपटे