By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:43 IST
1 / 7स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' या मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकर घराघरात पोहोचली.2 / 7या मालिकेत तिने साकारलेली रमा नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावते आहेत.3 / 7मालिकेव्यतिरिक्त शिवानी तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत येते. 4 / 7आपले सुंदर, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत शिवानी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.5 / 7नुकताच शिवानीने इन्स्टाग्रामवर तिचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. 'गं तूझं टपोरं डोळं...' या गाण्यावर तिने हा व्हिडीओ शूट केलाय.6 / 7कपाळावर टिकली, मोकळे केस आणि गडद जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये शिवानीचं सौंदर्य खुललं आहे.7 / 7दरम्यान, शिवानीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. शिवाय या व्हिडीओवर त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचा पाहायला मिळतोय.