"तू खोटं बोलतोस... मी पकडलंय तुला...", प्राजक्ता माळीचं होतं अफेयर पण झालं ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:27 IST
1 / 10अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. नुकतीच ती चिकी चिकी बुबूम बूम सिनेमात झळकली. प्राजक्ता व्यावसायिक लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. 2 / 10प्राजक्ताचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. त्यांना अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असते. प्राजक्ता अद्याप सिंगल आहे. तिने अलिकडेच एका मुलाखतीत तिने आईला लग्नासाठी मुलगा शोधायला सांगितले आहे. पण तुम्हाला माहित्येय का, एकेकाळी प्राजक्ताचे अफेयर होते. पण तिचे ब्रेकअप झाले. खुद्द तिनेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता.3 / 10प्राजक्ता माळीने या मुलाखतीत लग्नाबद्दल म्हटले होते की, डोक्याची मंडई होणार असेल तर नको माझ्या आयुष्यात मानसिक शांतता माझ्यासाठी पहिले प्राधान्य आहे. कारण तुमचं डोकं जर जाग्यावर नसेल तर काय आहे बिशाद की तुला एवढं सगळं करायला सुचेल. 4 / 10एक लाइफ पार्टनर तुमचं सगळं आयुष्य बदलवू शकतो. तुमचं रोजचं जगणं, तुमचं भविष्य, आर्थिक गणितं, मानसिक आरोग्य, हेल्थ. खूप मोठा निर्णय आहे हा आणि खूप मोठी रिस्कदेखील आहे, असे प्राजक्ता सांगते. 5 / 10ती पुढे म्हणाली की, काही मुलींना शारिरीक, भावनिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक गरज असतात, त्यांच्यासाठी लग्न ही खूप सोपी गोष्ट आहे. अध्यात्मामुळे माझ्या मानसिक, भावनिक गरजा खूप कमी झाल्या आहेत. त्यामुळे गरजा संपल्या तर कशाच्या जीवावर ते नाते तरणार फक्त प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणावर. पण याची गॅरंटी या कलियुगात तरी कोण देणार.6 / 10 नाते प्रामाणिक असेल तरच ते टिकेल. आईला पण मी याच गोष्टी समजवते. तिला पण कळते. हे डेंजरच आहे एकतर ही समोरच्याची वाट लावेल, असे प्राजक्ताने सांगितले. 7 / 10प्राजक्ताने सांगितले की, मी मध्येमध्ये प्रेमात पडते, पण नंतर मला कळते की हे शेवटपर्यंत नसणार आहे. तर यातून बाहेर पडलं पाहिजे. मग मी सांगते की, ऐक मित्रा सगळं छान आहे पण हा जरा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तू घरी जा (हसत). आपण थांबूयात. असं मी सांगितलेले आहे.8 / 10हे पाच वर्षांपूर्वी सांगितलं आहे. तू खोटं बोलतोस माझ्याशी मी पकडलेलं आहे, हे त्याचे पुरावे आहेत. त्याला रितसर जय महाराष्ट्र करण्यात आल्याचे प्राजक्ताने सांगितले.9 / 10प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसते. 10 / 10प्राजक्ता माळीने नुकतेच फुलवंती सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती.