Join us

राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात साडीत मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? जिकडेतिकडे होतेय चिमुकलीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:55 IST

1 / 9
71st National Film Awards: ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. मंगळवारी(२३ सप्टेंबर) दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
2 / 9
मराठीतील ४ बालकलाकारांना यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात सन्मानित करण्यात आले. 'नाळ २' चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप तर जिप्सी सिनेमासाठी कबीर खांडारे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला.
3 / 9
पण, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते चिमुकल्या त्रिशा ठोसर हिने. राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्रिशा चक्क साडी नेसून गेली होती.
4 / 9
४ वर्षीय त्रिशाचा आत्मविश्वास पाहून उपस्थितही भारावून गेले. त्रिशा स्टेजवर जाताच सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडात तिला प्रोत्साहन दिलं.
5 / 9
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्रिशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साडी नेसून मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण?
6 / 9
त्रिशा ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय बालकलाकार आहे. काही सिनेमा, जाहिराती आणि वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे.
7 / 9
'नाळ २'मध्ये त्रिशाने चिमीची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ जाधवच्या सिनेमातही ती झळकली आहे.
8 / 9
महेश मांजरेकरांच्या आगामी मराठी सिनेमात त्रिशा महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
9 / 9
'मानवत मर्डर्स', 'पेट पुराण' या वेब सीरिजमध्येही त्रिशा झळकली आहे.
टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारनाळ