"तुमची आठवण येते पप्पा...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश भावुक, शेअर केले Unseen फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 10:09 IST
1 / 8रितेश देशमुख हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. रितेश हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. 2 / 8आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने रितेशने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. 3 / 8विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावुक झाला आहे. रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन विलासराव देशमुख यांचे काही unseen फोटो शेअर केले आहेत. 4 / 8हे फोटो शेअर करत रितेशने भावुक पोस्ट लिहिली आहे. 'My forever, my everything…', असं कॅप्शन त्याने फोटोंना दिलं आहे. 5 / 8त्याबरोबरच 'तुमची आठवण येते पप्पा...' असंही रितेशने पुढे म्हटलं आहे. 6 / 8रितेशच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत दिवंगत नेते विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली आहे. 7 / 8रितेश कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. देशमुख कुटुंब हे लातुरच्या राजकारणातील नावाजलेलं घराणं आहे. 8 / 8विलासराव देशमुख यांचं नाव महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नेत्यांमध्ये कायमच घेतलं जातं. १९९९ ते २००८ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होती. १४ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांचं निधन झालं.