By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:40 IST
1 / 11नेसरीखिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आपल्या आत्मबलिदानाने इतिहास अजरामर केला. प्रतापराव आणि त्यांच्या शिलेदारांचा हा अतुलनीय पराक्रम दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटातून भव्य स्वरूपात घेऊन येत आहेत. 2 / 11प्रतापरावांच्या भूमिकेत असणारे अभिनेता प्रवीण तरडे यांच्यासह हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या कलाकारांसोबत हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.3 / 11'वेडात मराठे वीर दौडले सात' हा सिनेमात महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर सिनेमात दत्ताजी पागे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.4 / 11सत्या मांजरेकर शिवाय 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात महेश मांजरेकर यांची लेकही झळकणार आहे. कोणती लेक झळकणार आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना.5 / 11'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात अभिनेत्री गौरी इंगवलेदेखील झळकणार आहे.6 / 11गौरी इंगवले सोबत दिपाली सय्यद, शिवानी सुर्वे हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.7 / 11गौरी इंगवलेने फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, इतक्या मोठ्या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. वेडात मराठे वीर दौडले सात!8 / 11‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा थरार रुपेरी पडद्यावर पहाण्यासाठी आपल्याला २०२३च्या दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.9 / 11गौरी हिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'कुटुंब' या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केले होते. 10 / 11. तसेच ओवी नाटकात तिने मध्यवर्ती भूमिका केली होती. नुकताच तिचा पांघरूण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील तिच्या कामाची सर्वत्र खूप प्रशंसा झाली.11 / 11शेवटची ती दे धक्का २ चित्रपटात सायलीच्या भूमिकेत पाहायला मिळाली.