सोनाली कुलकर्णी पतीसोबत व्हेकेशन मोडवर, शेअर केला जिराफसोबतचा मजेशीर अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:13 IST
1 / 10अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni) परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.2 / 10 सोनाली आणि तिचा पती कुणाल हे नैरोबी, केनिया येथील 'जिराफ सेंटर'मध्ये फिरायला गेले आहेत.3 / 10सोनालीने जिराफसोबत घेतलेला मजेदार अनुभव चाहत्यांसमोर शेअर केला आहे.4 / 10सोनालीने 'जिराफ सेंटर'मधील 'एडी' (Eddie) नावाच्या एका जिराफसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न थोडा मजेदार ठरला.5 / 10 तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू स्पष्ट दिसत आहे, तर जिराफ मात्र सेल्फीसाठी तयार नसलेला दिसतोय.6 / 10या फोटोला सोनालीने 'When Eddie chose to say no to my selfie' असं कॅप्शन दिलं आहे.7 / 10सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनीही खूप लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 8 / 10 सोनालीला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे, विशेषकरुन ती भारताबाहेरील अनेक देशात भटकंती करत असते.9 / 10यावेळी तिच्यासोबत तिचा पती कुणालही सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसला.10 / 10कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.