By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:07 IST
1 / 9महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं पती कुणालसोबत लंडनमध्ये दुसऱ्यांदा लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या, हे तुम्हाला ठाऊक आहेच. या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्यास तुम्ही उत्सुक असालच. 2 / 9आता सोनालीने या लंडनमधील लग्नाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘आमच्या पहिल्याच लग्नाची दुसरी गोष्ट...,’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.3 / 9 ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर तिचा लग्नसोहळ्यांची मालिका प्रदर्शित करण्यात आली. त्याची झलक सोनालीनं शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळते आहे.4 / 9सोनाली व कुणाल यांनी कोरोना काळात लग्न करून फॅन्सना सुखद धक्का दिला होता. ते लग्न दुबईत झालं. अगदी चार दोन लोकांच्या उपस्थितीत एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता.5 / 9 दुबईचं लग्न अगदी सोनाली-कुणालच्या घरच्यांनी आणि मित्र- मैत्रिणींनी व्हिडिओ कॉलवरच पाहिलं होतं. दुबईच्या लग्नात ना विधी होत्या, ना हौस मौज. 6 / 9मग काय, सोनाली व कुणालनं पुन्हा एकदा विधीवत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हा निर्णय अमलातही आला. यावेळी त्यांनी लग्नासाठी लंडनची निवड केली. 7 / 9लंडनमध्ये अगदी शाही थाटात सोनाली व कुणालनं विधीवत लग्न केलं. अर्थात या लग्नाचा एकही फोटो व व्हिडीओ समोर आला नव्हता. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर चाहत्यांनी ही इच्छा पूर्ण झाली आहे.8 / 9 सोनाली व कुणालच्या लंडनमधील लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ आता समोर आले आहेत.‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा शाही लग्नसोहळ्याची तीन भागांची मालिका काल प्रदर्शित झाली. 9 / 9 लंडनमध्ये सोनालीनं धुमधडाक्यात लग्न केलं. तिच्या लग्नाची संपूर्ण मालिका चाहत्यांना बघता आली. एखाद्या मराठी अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोनाली याची पहिली मानकरी ठरली आहे.