"सिनेमाच्या पोस्टरवर अभिनेत्रींनाच अर्धनग्न दाखवण्याची मानसिकता...", मराठी अभिनेत्रीने केलेला जाहीर विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:55 IST
1 / 7आजकाल सिनेमा विकण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. एखादा सिनेमा चालावा म्हणून मुख्य कलाकारांसंबंधी अफवा पसरवणं, प्रक्षोभक वक्तव्य करणं असे वेगवेगळे पर्याय अवलंबले जातात जेणेकरुन सिनेमा चर्चेत राहील.2 / 7काही सिनेमांच्या पोस्टर्स, ट्रेलरमध्ये अभिनेत्रीला अर्धनग्नही दाखवलं जातं. हा सुद्धा मेकर्सच्या प्लॅनिंगचाच भाग असतो.3 / 7या मानसिकतेविरोधात एक मराठी अभिनेत्री रोखठोक बोलली होती. हा अॅटिट्युड किती चुकीचा आहे हे तिने बोलून बेधडकपणे सांगितलं होतं. 4 / 7ही अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आपल्या कमाल अभिनयाने स्मिता पाटील यांनी सर्वांना प्रेमात पाडलं. त्यांच्या अचानक निधनाने इंडस्ट्री आणि चाहते हळहळले होते. 5 / 7एका मुलाखतीत स्मिता पाटील म्हणालेल्या की, 'मेकर्स प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी मुद्दामून अभिनेत्रींना तोकड्या कपड्यात दाखवतात. पुरुषाला तर अर्धनग्न दाखवू शकत नाही कारण त्याचा काही उपयोग नाही.'6 / 7 'म्हणून मग स्त्रीलाच अर्धनग्न दाखवा आणि १०० लोक येतील अशी ही मानसिकता आहे. हा सिनेमा पाहा कारण यात सेक्स आणि अश्लीलता आहे..भारतातील प्रेक्षकांसाठी हे काही नवीन नाही कारण त्यांना हे पाहण्यासाठी भाग पाडलं गेलं आहे.'7 / 7'हा अॅटिट्यूड खूप चुकीचा आहे. जर सिनेमा खरोखरंच चांगला असेल तर तो चालेलच. अशा पोस्टर्समुळे सिनेमा सिनेमा चालत नाही.'