By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:16 IST
1 / 9मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन आणि गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'शाळा'. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.2 / 9या सिनेमात केतकी माटेगावकर आणि अंशुमन जोशी मुख्य भूमिकेत होते. अंशुमनने सिनेमात मुकुंद जोशी ही भूमिका साकारली होती. 3 / 9साधा भोळा, शाळेतील हुशार विद्यार्थी असलेला मुकुंद प्रेक्षकांना भलताच आवडला होता. मात्र या सिनेमानंतर तो गायब झाला. 4 / 9शाळा सिनेमानंतर तो कुठेच दिसला नाही. आता त्याच्यात खूप बदल झाला आहे. 5 / 9अंशुमन पडद्यावर दिसत नसला तरी तो सिनेसृष्टीत कार्यरत आहे. एक अभिनेता असण्यासोबत तो लेखक आणि दिग्दर्शकही आहे. 6 / 9कोकण या युट्यूब सीरिजमध्ये तो दिसला होता. अंशुमनने मल्याळम सिनेमातही काम केलं आहे. 7 / 9२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या थँकम सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. हा त्याचा पहिला साऊथ सिनेमा होता. 8 / 9आता अंशुमन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंशुमन लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 9 / 9'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरेसोबत अंशुमन लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.