Join us  

पंढरपूरच्या प्राजक्ताने मुंबईत असं सजवलंय तिचं ड्रीम होम; पाहा अभिनेत्रीच्या घराचे Inside photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 6:00 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर प्राजक्ताने कलाविश्वात तिचं स्थान भक्कम केलं.
2 / 8
आज तरुणांमध्ये प्राजक्ताची विशेष क्रेझ आहे. विशेष म्हणजे फार कमी वयात प्राजक्ताने अनेक मोठमोठी आव्हानं स्वीकारली आणि ती यशस्वीपणे पार सुद्धा करुन दाखवली.
3 / 8
मालिका, सिनेमा, रिअॅलिटी शोमध्ये झळकलेली प्राजक्ता कायम चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरत असते.
4 / 8
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताच्या घराची चर्चा रंगली आहे. पंढरपुरात जन्मलेली प्राजक्ता पुण्यात लहानाची मोठी झाली.
5 / 8
सध्या करिअरनिमित्त प्राजक्ता मुंबईत वास्तव्यास आहे. त्यामुळेच मुंबईत तिने तिचं हक्काचं घर घेतलं असून ते कसं दिसते ते पाहुयात.
6 / 8
प्राजक्ताने हॉलमध्ये पुस्तकांसाठी झाडाच्या आकाराचा स्टँड तयार केला आहे. या स्टँडवर असंख्य पुस्तके असल्याचं दिसून येतं आहेत.
7 / 8
प्राजक्ताने घराचा एक कोपरा तिच्या पुरस्कारांसाठी केला आहे. या लाकडी स्टॅन्डवर अनेक ट्रॉफी ठेवल्या आहेत.
8 / 8
खिडकीजवळी भिंतीवरदेखील तिने आपल्या पुरस्कार सजवून ठेवले आहेत.
टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीसिनेमासुंदर गृहनियोजनमुंबई