Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायली संजीव अशोक सराफ यांना म्हणते 'पप्पा', या नात्याबद्दल अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 12:12 IST

1 / 8
काहे दिया परदेस मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव लवकरच झिम्मा चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिचे चाहते तिच्या या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
2 / 8
तुम्हाला माहित्येक का, सायली संजीव अशोक सराफ यांना पप्पा आणि निवेदिता सराफ यांना मम्मा म्हणते. काहे दिया परदेस या मालिकेमुळे अशोक सराफ सायलीला लेक मानू लागले होते.
3 / 8
सायली संजीव अशोक मामांचं नातं नेमकं कसं जुळलं याचा खुलासा तिने स्वतःच एका मुलाखतीत केला आहे. सायली संजीव अशोक सराफ यांना पप्पा का म्हणते याचे कारण सांगताना सायली म्हणाली की, मी माझ्या वडिलांना बाबा म्हणते. त्यामुळे अशोक सराफ यांनी मला पप्पा म्हणण्यास सांगितले.
4 / 8
खरं तर अशोक सराफ हे खूप दिग्गज कलाकार आहेत. त्यांनी मला काहे दिया परदेस मालिकेपासून पाहिले होते. माझी त्यांच्याशी अगोदर कुठलीच ओळख नव्हती. त्यांनी माझी काहे दिया परदेस ही सिरीयल पाहिली होती, असे सायलीने सांगितले.
5 / 8
काहे दिया परदेस मालिकेचा प्रोमो पाहून सगळे ही निवेदिता सराफ यांची कॉपी आहे, असे म्हणत होते. त्यानंतर सगळीकडे असं झालं होतं की मी त्यांची मुलगी आहे. पण माझा त्यांच्याशी कुठलाच संपर्क नव्हता.
6 / 8
अशोक सराफ त्यांचे शूटिंग चालू असेल तेव्हा ते ८.३० वाजता न चुकता पॅक अप करायचे आणि ९ वाजता माझी मालिका पाहायचे. तोपर्यंत आमची अशी कधी कुठे भेट झाली नव्हती, असे तिने सांगितले.
7 / 8
पण अशोक सराफ यांच्या एका चित्रपटाच्या म्युजिक लॉन्च सोहळ्यात माझी भेट घडून आली. मी तिथे आलीये हे अशोक सराफ यांना कळले तेव्हा त्यांनी एका मित्राकडे निरोप पाठवला की प्लीज तिला घेऊन ये. ही आमची पहिली भेट होती. पण यानंतर आमच्यात बाप लेकीचं नाते तयार झाले होते.
8 / 8
एका पॉईंटला देव कसं करतो ना की आता वर्षभरापूर्वी माझे वडील गेले पण त्याअगोदर चार वर्षांपासून मी अशोक पप्पाना ओळखते. त्याने ते अगोदरच ठरवून ठेवलं होतं की इथे एक पोकळी निर्माण होणार आहे तर आपण एक तसा सपोर्ट तयार करून ठेवू. आमच्या दोघांतलं हे नातं खूप अमेझिंग आहे, असे सायली संजीवने सांगितले.
टॅग्स :सायली संजीवअशोक सराफनिवेदिता सराफ