Join us

भाषा समजेना तरीही जमलं, सारंग आणि पॉला कुठे भेटले? फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:47 IST

1 / 10
Sarang And Paula Lovestory: मराठी अभिनेता सारंग साठ्ये (Sarang Sathaye) लग्नबंधनात अडकला आहे. सारंगने त्याची गर्लफ्रेंड पॉला मॅकग्लेन (Paula Mcglynn) सोबत लग्न केलं आहे.
2 / 10
तब्बल १२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २८ सप्टेंबरला दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाचे खास फोटो सारंग आणि पॉलाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 10
या दोघांनी फोटो शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी दोघांचंही अभिनंदन केलंय. पण, तुम्हाला मराठमोळ्या सारंगच्या प्रेमात ही कॅनडियन मुलगी कशी पडली, हे माहितेय का? सारंग आणि पॉलाची फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी आहे.
4 / 10
सारंग आणि पॉलाची पहिली भेट ही टोरोंटो फेस्टिव्हलदरम्यान एका पार्टीत झाली होती. मात्र, त्यावेळी त्यांचं फारसं बोलणं झालं नव्हतं. सारंगची मैत्रिण आणि आताची भाडीपाची तिसरी पार्टनर अनुषा नंदकुमार हे एक शो करत होते. तेव्हा त्यांना कॅनडाहून एक मुलगी येणार सांगण्यात आलं. तर ती मुलगी होती पॉला मॅकग्लेन.
5 / 10
यानंतर पॉला भारतात आणि सांरग-पॉलाची ही दुसरी भेट झाली. पण, दुसऱ्यांदा पॉलाला पाहिल्यानंतर आधी कुठेतरी हिला पाहिल्याचं सांरगला आठवत होतं. पण, तिचं नाव मात्र सांरगला आठवत नव्हतं. तर दुसरीकडे पॉलाला सारंग चांगलाच आठवत होता.
6 / 10
सारंग आणि पॉलाच्या बोलण्याची सुरुवातच मजेदार झाली. मित्रांनी त्याला कॅनडाहून सारंगची फॅन आली आहे, अशी चिडवाचिडवी सुरू केली. त्यावेळी पॉला हिला मराठी बोलताही येत नव्हतं आणि समजतही नव्हतं. त्यामुळे सारंगला पॉलाशी संवाद साधण्यास अडचण व्हायची. तिच्याशी बोलताना सारंग मराठीतून फ्लर्ट करायचा. एकत्र काम करताना पॉलचा स्वभाव तिचे विचार, हळूहळू सारंगला आवडायला लागले होते.
7 / 10
पॉलालादेखील सारंग आवडू लागला होता आणि आई-वडिलांना सांगून एकाच महिन्यात पुण्यात घर घेऊन पॉला-सारंग आणि अनुषा एकत्र राहू लागले. Live In मध्ये राहताना दोघेही घरातील सर्व गोष्टी, कामं आणि घरखर्चही विभागून घ्यायचे.
8 / 10
कॅनडियन असूनही पॉला लवकरच मराठमोळ्या संस्कृतीत मिसळून गेली. विशेष म्हणजे, ज्या भाडिपा (BhaDiPa) मुळे सारंगला ओळख मिळाली, ती संस्था सुरू करण्याची संकल्पना पॉलाचीच होती.
9 / 10
पॉलनं महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, सारंग तिला नेहमी पुणे आणि आजूबाजूचा परिसर दाखवायला घेऊन जायचा, त्या वास्तूंचा, ठिकाणाचा इतिहास आणि संस्कृती पाहून मी भारावून जायचे. कॅनडामध्ये मी असं कालीच पाहिलं नव्हतं. बाहेरच्या देशात युट्यूबचे वारे मोठ्या प्रमाणात आहेत. कन्टेंट तयार करणं आणि युट्यूबद्वारे लोकांना तो दाखवणं हे बघत बघत आम्ही मोठे झालो. इथे मात्र तसे काही नव्हते. इथूनच 'भाडिपा' या युट्यूब चैनलची सुरुवात झाली. मी. सारंग आणि अनुषाने मिळून हे चॅनल सुरू केलं. आम्ही सुरुवात केली त्यावेळी मराठीमधून महाराष्ट्रात कोणी कन्टेंट तयार करत नव्हतं'.
10 / 10
पॉला वयाच्या अठराव्या वर्षी जपानला फिरून आली आहे. ती कुठल्याही संस्कृतीत लवकर मिसळून जाते, असं सारंगनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. सिनेमाच्या प्रेमापोटी पॉलनं महाराष्ट्रात पहिलं पाऊल ठेवलं आणि हळूहळू या मातीशी एकरूप झाली. आता सांरगशी लग्न झाल्यानं ती महाराष्ट्राची सून झाली आहे.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीटेलिव्हिजनलग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट