Join us

सई ताम्हणकरचा रेट्रो लूक, ब्लॅक अँड व्हाईट साडीत अभिनेत्रीनं लावला ग्लॅमरसचा तडका, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:53 IST

1 / 10
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत येत आहे.
2 / 10
काही दिवसांपूर्वी तिची देवमाणूस सिनेमातील लावणी आलेच मी समोर आली. तिने पहिल्यांदाच लावणी केल्यामुळे सर्व स्तरातून तिचे खूप कौतुक झाले.
3 / 10
अलिकडेच तिचा हिंदी सिनेमा ग्राउंड झिरो प्रदर्शित झाला. यात ती इमरान हाश्मीसोबत झळकली आहे. तर १ मे रोजी तिचा गुलकंद सिनेमा प्रदर्शित होतोय.
4 / 10
नुकतेच तिने गुलकंदच्या प्रमोशनसाठी रेट्रो लूक केला होता आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 10
सईने यावेळी ब्लॅक अँड व्हाइट साडी परिधान केली होती आणि त्यावर हटके हेअरस्टाईल केली आहे.
6 / 10
सई ताम्हणकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
7 / 10
याआधीही सईने ब्लॅक रंगाच्या साडीत फोटोशूट केले होते. त्यावर तिने फ्लोरल ब्लाउज परिधान केला होता.
8 / 10
या साडीतील तिच्या बोल्ड अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
9 / 10
सईचा गुलकंद हा मराठी सिनेमा उद्या (१ मे रोजी) प्रदर्शित होतोय. यात तिच्यासोबत समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
10 / 10
गुलकंद हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ पाहायला मिळणार आहे.
टॅग्स :सई ताम्हणकर