Join us

सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."

By देवेंद्र जाधव | Updated: June 19, 2025 12:20 IST

1 / 7
सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सई ताम्हणकरला आपण गेल्या काही वर्षांमध्ये मराठीसोबत हिंदी सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही अभिनय करताना पाहिलंय
2 / 7
सई ताम्हणकरने आजवर अनेक अभिनेत्यांसोबत काम केलंय. सई ताम्हणकरची जोडी कधी स्वप्नील जोशी तर कधी अंकुश चौधरीसोबत गाजली. सईला एका सुप्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न करायचं होतं.
3 / 7
सई ताम्हणकरने डिजिटल कमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला. सई म्हणाली ती आमिर खानची जबरा फॅन आहे. त्यामुळे तिला आमिर खानशी लग्न करायचं होतं.
4 / 7
इतकंच नव्हे आमिर खान आणि माधुरी दीक्षितचा दिल हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या कॅसेट्स सईने तिच्या वॉर्डरोबमध्ये अर्थात जिथे कपड्यांच्या कपाटात ठेवल्या होत्या.
5 / 7
आई मी ह्याच्याशीच लग्न करणार, असं सईने आईलाही सांगितलं होतं. अशाप्रकारे सईने आमिर खानशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली.
6 / 7
आपण ज्या गोष्टी मनात ठरवतो त्या गोष्टी नकळतपणे घडून जातात. तशीच गोष्ट सईच्या बाबतीत झाली. सईला आमिर खानच्या गाजलेल्या गजनी सिनेमात काम करायची संधी मिळाली
7 / 7
इतकंच नव्हे, सई ताम्हणकरने आमिर खानसोबत पाणी फाऊंडेशनसाठी काम केलं आहे. अशाप्रकारे सईने आमिर खानविषयी आदर आणि प्रेम दर्शवलं आहे.
टॅग्स :सई ताम्हणकरआमिर खानबॉलिवूडमराठी अभिनेतामराठी चित्रपट