By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:06 IST
1 / 9रितेश देशमुख आणि जिनिलिया हे केवळ सिनेसृष्टीतलेच नव्हे तर महाराष्ट्राचे लाडके कपल आहेत. लाडक्या दादा वहिनींचे हजारो चाहते आहेत. 2 / 9रितेश आणि जिनिलियाने २०१२ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. आज त्यांच्या लग्नाचा १४वा वाढदिवस आहे. 3 / 9रितेश आणि जिनिलियाने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलियाने खास फोटो शेअर केले आहेत.4 / 9रितेश-जिनिलयाकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. जिनिलियाने एका मुलाखतीत त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं होतं. तिने याचं क्रेडिट रितेशला दिलं होतं. 5 / 9जिनिलिया म्हणाली होती की 'मी याचं क्रेडिट रितेशला देईन. कारण तो कोणत्याच गोष्टीचा इश्यू करत नाही'. 6 / 9'आम्ही कधीच भांडत नाही. आमचं भांडण तेव्हाच होतं जेव्हा मला भांडायचं असतं'. 7 / 9'त्याला छोट्या छोट्या गोष्टींवर भांडायला आवडत नाही. कधी कधी मलाच तसं वागायला आवडतं. कारण मी वेगळी व्यक्ती आहे'. 8 / 9'पण तोदेखील मला आवडत नाही. मला वाटतं की कधी कधी यातच आम्हाला संवादाचा सूर सापडतो', असं जिनिलियाने सांगितलं होतं. 9 / 9रितेश आणि जिनिलियाला दोन मुले आहेत. अनेकदा रितेश-जिनिलिया कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात.