Join us

नॉनव्हेजला स्पर्शही करत नाहीत रितेश-जिनिलिया! देशमुख कपलचं डाएट सीक्रेट माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:18 IST

1 / 8
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी कायमच चर्चेत असतात.
2 / 8
रितेश आणि जिनिलिया हे व्हेजिटिरियन आहेत. ते केवळ व्हेजिटेरियनच नव्हे तर व्हिगनही आहेत.
3 / 8
त्यामुळेच रितेश आणि जिनिलिया नॉनव्हेजला स्पर्शदेखील करत नाहीत.
4 / 8
एवढंच काय व्हिगन असल्यामुळे ते अंडी, दूध, तूप असे प्राण्यांपासून मिळणारे पदार्थही खात नाहीत.
5 / 8
रितेश आणि जिनिलिया सुरुवातीला नॉनव्हेज खात होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी मांसाहार पूर्णपणे बंद केला. त्यानंतर ते व्हिगन झाले.
6 / 8
रितेश-जिनिलिया त्यांच्या आहाराची पूर्ण काळजी घेताना दिसतात. त्यांच्या जेवणात महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश असतो.
7 / 8
भाकरी-पिटलं, तृणधान्ये यांचा त्यांच्या आहारात समावेश असतो. एवढंच काय जिनिलिया जेवण बनवताना साधं तेलही वापरत नाही. शेंगदाणाच्या कुटात जेवण बनवत असल्याचं तिने सांगितलं होतं.
8 / 8
रितेश-जिनिलियाने २०१२ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत.
टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजासेलिब्रिटी