By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 18:12 IST
1 / 10 रिंकू राजगुरू मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने सैराट चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि या चित्रपटातून ती एका रात्रीत लोकप्रिय झाली. 2 / 10'सैराट' या पदार्पणाच्या सिनेमातून लोकप्रिय झालेल्या रिंकू राजगुरू हिचा अभिनयप्रवास विविधांगी भूमिकांनी रंगला आहे. 'आर्ची'नंतर अशीच एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा तिनं 'आशा' या सिनेमात साकारली आहे.3 / 10नुकतंच रिंकू राजगुरूचा 'आशा' हा सिनेमा १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिंकूने या चित्रपटात एका 'आशा' सेविकेची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे.4 / 10'आशा' या सिनेमात महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. 5 / 106 / 10यावेळी 'आशा' चित्रपटाच्या निमित्तानं रिंकूने आपल्या आई-बाबा आणि भावासोबत खास फोटोशूट केले. या सुंदर फॅमिली फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.7 / 10 रिंकू ही सोनेरी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती. तर तिच्या आईनं हलका हिरव्या रंगाची साडी नेसली होती. 8 / 10रिंकू राजगुरू ही अकलूज येथील एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिचे आई-वडील आशा आणि महादेव दोघेही शिक्षक आहेत. 9 / 10आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच रिंकूने स्वत:ला कलाविश्वात सिद्ध केले आहे. त्यांच्यामुळे रिंकूने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 10 / 10 रिंकू राजगुरू हिच्या लहान भावाचे नाव सिद्धार्थ असून, त्यांच्यासोबतचे तिचे रक्षाबंधन आणि भाऊबीजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.