By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:41 IST
1 / 10आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगणारे अनेक सिनेमे आणि मालिका आहेत. 2 / 10अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या भूमिका साकारल्या. मात्र महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 3 / 10अनेक अभिनेत्रींनी महाराणी येसूबाईंची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारली. गेल्या वर्षीच प्रदर्शित झालेल्या 'छावा' सिनेमा अभिनेत्री रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत होती. 4 / 10रश्मिकाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. अभिनयात तिने कसलीही कसर सोडलेली नाही. पण, असं असलं तरी ती प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवू शकली नाही.5 / 10'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात अभिनेत्री रेवती लिमये ही महाराणी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत होती. या सिनेमात गश्मीर महाजनी संभाजी महाराजांच्या भूमिकेत होता.6 / 10अभिनेत्री तृप्ती तोराडमल हिने 'शिवरायांचा छावा' या सिनेमात येसूबाईंची भूमिका साकारली होती. दिग्पाल लांजेकरांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.7 / 10अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील येसूबाईंची भूमिका साकारली होती. 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या सिनेमात ती दिसली होती. 8 / 10पण, या सगळ्या अभिनेत्रींमध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने साकारलेली येसूबाईंची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. ती म्हणजे प्राजक्ता गायकवाड. 9 / 10प्राजक्ताने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. 10 / 10आजही येसूबाई म्हटलं की प्रेक्षकांना प्राजक्ताच डोळ्यासमोर येते.