Join us

Navratri 2025: नव्या साड्यांची गरज काय? अभिनेत्रीने नवरात्रीच्या नवरंगांसाठी वापरली भन्नाट आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:05 IST

1 / 9
नवरात्रोत्सवामुळे वातावरण मंगलमय झालं आहे. नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड असतो.
2 / 9
अगदी सेलिब्रिटीही हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. अनेक अभिनेत्री यानिमित्ताने नऊ रंगाच्या कपड्यांमध्ये खास फोटोशूटही करतात.
3 / 9
एका मराठी अभिनेत्रीने मात्र यावर भन्नाट उपाय शोधून काढला आहे.
4 / 9
अभिनेत्री किशोरी गोडबोले हिने नऊ रंगाच्या साड्यांमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.
5 / 9
पण, यासाठी अभिनेत्रीने कोणतीही नवी साडी विकत घेतलेली नाही. किंवा कोणतं फोटोशूटही केलेलं नाही.
6 / 9
अभिनेत्रीने तिच्याकडे असलेल्या काही रंगाच्या साडीत फोटो काढले आहेत. तर काही फोटो AI चा वापर करून जनरेट केले आहेत.
7 / 9
पण किशोरीचे खरे फोटो आणि AI ने तयार केलेले फोटो यात फरक सांगणं खूपच कठीण आहे.
8 / 9
अभिनेत्रीच्या खऱ्याखुऱ्या फोटोंप्रमाणेच AI ने जनरेट केलेल्या फोटोंमध्येही तिचं अस्सल सौंदर्य दिसत आहे.
9 / 9
किशोरीने शेअर केलेले हे फोटो पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.
टॅग्स :किशोरी गोडबोलेनवरात्री