Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात होती मुक्ता बर्वे, ४७व्या वर्षीही आहे सिंगल; का केलं नाही लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:58 IST

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस आहे. मुक्ता आज तिचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे.
2 / 9
पण, वयाच्या पन्नाशीत आलेली मुक्ता अजूनही सिंगल आहे. अद्याप लग्न का केलं नाही, याबाबत मुक्ताने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
3 / 9
मुक्ता म्हणाली होती की, खरं तर हा एखाद्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे असे प्रश्न कुणीही कुणालाही विचारू नयेत.
4 / 9
'मी आता जेवढी सुखी आणि आनंदी आहे, त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल, तरच मी लग्न करेन', असंही ती म्हणाली.
5 / 9
मुक्ता बर्वेचा मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शकावर क्रश होता. ‘नंबर १ यारी विथ स्वप्नील’ या शोमध्ये हसत तिने याची कबुली दिली होती.
6 / 9
दिग्दर्शक सतीश राजवाडेवर मुक्ता बर्वेचं क्रश होतं. 'सतीशच्या व्यक्तिमत्त्वाने आम्ही अनेक जणी भारावून गेलो होतो. त्याचा वावर, त्याची शैली, सगळंच प्रभावी वाटायचं'.
7 / 9
'त्याला बघून आम्ही नाटकांमध्ये अधिक रस घ्यायला लागलो होतो. पण नंतर समजलं की त्याचं लग्न झालं आहे, तेव्हा जरा हिरमोडच झाला. तरीही आमची मैत्री मात्र तितकीच घट्ट राहिली', असं मुक्ता म्हणाली होती.
8 / 9
मुक्ताने सतीश राजवाडेंच्या 'मुंबई पुणे मुंबई', 'एक डाव धोबीपछाड', 'रुद्रम' या सिनेमात काम केलं आहे.
9 / 9
'जोगवा' या सिनेमामुळे मुक्ताला प्रसिद्धी मिळाली. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'माया' या सिनेमात ती दिसली होती.
टॅग्स :मुक्ता बर्वेसेलिब्रिटी