विवेक अन् रीमा लागूंची एकुलती एक मुलगी मृण्मयी काय करते? आमिर खानशी आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:15 IST
1 / 8बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतही अनेक कलाकारांची मुलं याच इंडस्ट्रीत काम करत आहेत. नीना कुलकर्णी, सचिन -सुप्रिया पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डेसह अनेक कलाकारांची मुलं आज कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करत आहेत.2 / 8त्यापैकीच एक विवेक लागू आणि रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू. विवेक लागू यांचं काल वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालंय. तर रीमा लागू २०१७ मध्येच हे जग सोडून गेल्या.3 / 8त्यांची मुलगी मृ्ण्मयी लागू हिंदी इंडस्ट्रीत सक्रीय आहे. दिसायला आईप्रमाणेच अगदी सुंदर अशी मृण्मयी. तिच्यात वडिलांचं लेखनाचं टॅलेंट आलं आहे.4 / 8तापसी पन्नूचा 'थप्पड' सिनेमा आठवत असेलच. मृण्मयीनेच याचं लेखन केलं होतं. तसंच गाजलेल्या 'स्कूप' सीरिजचीही ति लेखिका आहे.5 / 8मृण्मयीने आमिरच्या अनेक सिनेमांसाठी काम केलं आहे.'३ इडियट्स','जिंदगी ना मिलेगी दोबारा','तलाश','वी आर फॅमिली' या सिनेमांसाठी तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. आमिरच्या 'सत्यमेव जयते' या टीव्ही शोच्या पहिल्या सीझनसाठीही ती सहाय्यक दिग्दर्शक होती. 6 / 8'दंगल','पीके','गुलाब गँग' या सिनेमांमध्ये तिने स्क्रिप्ट सुपरव्हायजर म्हणून काम केले आहे. तसंच तिला इंग्लिश थिएटरची आवड आहे. तिने काही इंग्रजी नाटकांमध्ये कामही केलं आहे. 7 / 8मृण्मयीने अभिनयही केला आहे. 'बयो' या मराठी सिनेमासाठी तिला झी गौरव पुरस्कारही मिळाला होता. २०१० मध्ये तिने 'हॅलो जिंदगी' या हिंदी सिनेमातून पदार्पण केलं होतं.8 / 8२०१४ मध्ये मृण्मयीने असिस्टंट दिग्दर्शक विनय वायकूळसोबत लग्न केलं. सध्या ती संसार आणि करिअर दोन्ही चांगल्या पद्धतीने हाताळत आहे.