Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिथिला पालकर बनली जलपरी! ऑस्ट्रेलियात केलं सर्फिंग, बिकिनी लूकनं चाहत्यांना लावलं वेडं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:18 IST

1 / 10
मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या ऑस्ट्रेलियातील निसर्गरम्य ठिकाणी सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहे.
2 / 10
चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मिथिलाने बीचवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 10
मिथिलाने ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध गोल्ड कोस्ट (Gold Coast) येथील सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर सर्फिंगचा थरार अनुभवला.
4 / 10
गोल्ड कोस्ट हे क्वीन्सलँड (Queensland) राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे, जे सर्फिंगसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
5 / 10
सर्फिंगसाठी तिने खास लूक केला होता. ती गडद निळ्या रंगाचा लाँग-स्लीव्ह टी-शर्ट आणि त्यावर रंगीत प्रिंटचा आकर्षक स्विमसूट परिधान केला होता.
6 / 10
स्वतःच्या या सर्फिंग अनुभवाविषयी मिथिलाने कॅप्शनमध्ये लिहलं, 'पहिल्यांदाच सर्फिंग करण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा नक्कीच प्रयत्न करेन!'.
7 / 10
मिथिलाने 'गोराईड अ वेव्ह' कडून सर्फिंगचे विशेष प्रशिक्षण घेतले.
8 / 10
मिथिलाने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, ऑस्ट्रेलियातील नैसर्गिक सौंदर्य आणि लोकांचा पाहुणचार पाहून ती भारावून गेली आहे.
9 / 10
ती म्हणाली, 'मला ऑस्ट्रेलियातील हा अनुभव खूप आवडले आहेत आणि मी पुन्हा या सुंदर देशाला भेट देण्यासाठी उत्सुक आहे'.
10 / 10
मिथिलाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :मिथिला पालकरआॅस्ट्रेलिया