Join us  

झोकात पार पडलं उर्मिला निंबाळकरच्या लेकाचं बारसं; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 5:39 PM

1 / 9
लोकप्रिय मराठमोठी अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे उर्मिला निंबाळकर. आजच्या घडीला उर्मिलाचं नाव ठावूक नाही अशी एकही व्यक्ती नाही. मराठीमध्ये उत्तम कंटेंट क्रिएट करण्यासाठी उर्मिला प्रसिद्ध आहे.
2 / 9
प्रत्येकाला आपल्यातली आणि जिव्हाळ्याची वाटणारी उर्मिला नुकतीच आई झाली आहे. अलिकडेच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
3 / 9
विशेष म्हणजे उर्मिलाप्रमाणेच तिचं लहानसं बाळही सोशल मीडियावर चर्चेत येत असून या बाळाविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो.
4 / 9
ससा, पिल्लू, मऊसूत व्यक्ती अशा कित्येक टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या उर्मिलाच्या चिमुकल्याचं अलिकडेच थाटात बारसं पार पडलं.
5 / 9
उर्मिलाने या बारशाचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच बाळाचं सुंदर नावही चाहत्यांना सांगितलं आहे.
6 / 9
'बाळामुळे घराचं गोकुळ होतं, असं का म्हणतात, ते आज कळलं, एका मऊसुत सशानं आमच्या सर्वांच्या आयुष्यात अथांग सुख आणलंय!', असं कॅप्शन देत उर्मिलाने तिच्या बाळाचं नाव सांगितलं.
7 / 9
उर्मिलाच्या बाळाचं नाव अथांग असं ठेवण्यात आलं असून अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
8 / 9
मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत पुण्यातील ठेपेवाडा इथे उर्मिलाचं डोहाळजेवण पार पडलं होतं.
9 / 9
उर्मिलाने तिचा प्रेग्नंसी काळ उत्तमरित्या एन्जॉय केला होता. यावेळचे काही ग्लॅमरस फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
टॅग्स :उर्मिला निंबाळकरसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा