मराठमोळी अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:20 IST
1 / 8सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे तेजश्री जाधव.2 / 8तेजश्री जाधव हिने नुकतेच बॉयफ्रेंड रोहन सिंगसोबत लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. 3 / 8तेजश्री जाधव आणि रोहन सिंग यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. 4 / 8तेजश्री जाधवने लग्नात नारंगी रंगाची साडी नेसली होती. तिच्या नवऱ्याने बेज रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.5 / 8लग्नाच्या फोटोंमध्ये तेजश्री आणि रोहन रोमँटिक अंदाजात दिसत आहे.6 / 8तेजश्रीचे चाहते तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहे.7 / 8तेजश्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रविण तरडे मुख्य भूमिकेत असलेल्या 'बलोच' या सिनेमात ती झळकली होती. 8 / 8२०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'अकिरा' सिनेमातून तेजश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने सोनाक्षी सिन्हाबरोबर स्क्रीन शेअर केली होती.