Join us

Photos: हुआ मुझे भी प्यार हुआ...! संस्कृती बालगुडेचं लास वेगासमध्ये सुंदर फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:13 IST

1 / 7
मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) तिच्या विविधांगी भूमिकांसाठी ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'पिंजरा' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती.
2 / 7
संस्कृतीने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. मात्र इंडस्ट्रीतील गटबाजीमुळे तिला म्हणावी तशी संधी मिळाली नाही.
3 / 7
या परिस्थितीही संस्कृतीने अभिमान वाटावं असं काम केलं आहे. ती 'करेज' या इंग्रजी सिनेमात झळकली आहे. इतकंच नाही तर तिच्या या सिनेमाचं स्क्रीनिंग थेट अमेरिकेतील वॉर्नर्स ब्रदर्स स्टुडिओमध्ये झालं.
4 / 7
संस्कृती तिच्या स्टायलिश लूकसाठीही ओळखली जाते. लास वेगासमध्ये केलेलं तिचं हे फोटोशूट पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे.
5 / 7
ब्लॅक टॉप, पर्पल मिनी स्कर्ट, ओव्हरकोट आणि लाँग शूज या लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत. मागे लास वेगासचा प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटही दिसतोय.
6 / 7
“तो क्यूँ ना मैं भी कह दूं, कह दूं हुआ मुझे भी प्यार हुआ' असं रोमँटिक कॅप्शन तिने दिलं आहे. प्रेमात पडलेलं नसतानाही तसं दाखवायला काय हरकत आहे असंही तिने लिहिलं आहे.
7 / 7
संस्कृतीची फोटोतील स्माईल लाखमोलाची दिसतेय. तसंच तिच्या क्युट इयररिंग्सनेही तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
टॅग्स :संस्कृती बालगुडेमराठी अभिनेता