Join us

सई ताम्हणकरचं स्टनिंग फोटोशूट, नेटकरी म्हणतात- "हाफ पँटवर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:56 IST

1 / 8
सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच तिने बॉलिवूडही गाजवलं आहे.
2 / 8
अभिनयाबरोबरच सई तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. तिचे हटके अंदाजातील फोटोही व्हायरल होत असतात.
3 / 8
सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतंच सईने स्टनिंग अंदाजात फोटोशूट केलं आहे.
4 / 8
काळ्या रंगाची जाळीदार पँट आणि जॅकेट सईने परिधान केलं आहे. फोटोसाठी सईने खास पोझही दिल्या आहेत.
5 / 8
हे फोटो शेअर करत सईने 'Darkly, delicately' असं म्हटलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
6 / 8
एकाने 'हाफ पँटवर जाळी चढवल्यासारखे वाटत आहे...', अशी कमेंट केली आहे. तर अनेकांना तिचं हे फोटोशूट पसंत पडलं आहे.
7 / 8
सईने सिनेमांबरोबरच वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'अग्नी'मध्ये ती दिसली होती.
8 / 8
'द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटी