Join us

'लग्न करशील का?' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूल साईड फोटोंवर चाहत्याची कमेंट; थेट घातली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:35 IST

1 / 7
मराठमोळ्या अभिनेत्री जेव्हा बोल्ड फोटो पोस्ट करतात तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात. सई ताम्हणकर, प्रिया बापट ते आता अनेक तरुण अभिनेत्रींच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ असतो.
2 / 7
त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे रितीका श्रोत्री(Ritika Shrotri). रितीका नुकतीच 'मुक्कामपोस्ट बोबिंलवाडी' सिनेमात दिसली. सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
3 / 7
रितीकाने आतापर्यंत 'बॉइज', 'सरी' , 'डार्लिंग', 'टकाटक', 'स्लॅमबूक','लंडन मिसळ','प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं','बकेट लिस्ट' या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
4 / 7
रितिका तिच्या लूक्समुळेही ओळखली जाते. स्लीम अँड ट्रीम फिगरमध्ये ती फोटो पोस्ट करत असते. तिच्या फिटनेसमुळे ती कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
5 / 7
नुकतेच तिने स्वीमिंग पूलजवळ एक फोटोशूट केलं आहे. गुलाबी रंगाच्या टू पीस आऊटफिटमध्ये तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
6 / 7
यात रितिकाची टोन्ड फिगर पाहून चाहत्यांची नजर तिच्यावरच खिळली आहे. बांधलेले केस, गुलाबी ड्रेस अशा लूकमध्ये ती पूलसाईडला बसली आहे. 'पूल डे' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
7 / 7
'मी तुझ्या प्रेमात पडलो आहे लग्न करशील का खरंच खूप आवडतेस' असं म्हणत एकाने थेट तिला कमेंटमध्ये मागणीच घातली आहे.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीव्हायरल फोटोज्सोशल मीडिया