आला वारा गेला वारा, ताईचा pic म्हणजे...; प्रिया बापटचे फोटो भारी, कमेंट्स तर लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 16:54 IST
1 / 7अभिनेत्री प्रिया बापटचे साडीतील काही फोटो सध्या जाम चर्चेत आहेत. त्याहीपेक्षा चर्चा आहे ती या फोटोवरच्या कमेंट्सची.2 / 7होय, प्रियाने सोशल मीडियावर वेगवेगळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रिया कमालीची सुंदर दिसतेय. गुलाबी, काळी, हिरवी, निळी, जांगळी... या साडीत तिचं सौंदर्य खुलून आलंय.3 / 7हे फोटो पाहून चाहते इतके बेभान झालेत की, या प्रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा नुसता पाऊस पडला.4 / 7अनेकांनी प्रियाच्या या फोटोंचं भरभरून कौतुक केलं. पण यातल्या दोन कमेंट्स विशेष लक्षवेधी ठरल्यात.5 / 7प्रिया बापटचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोबत या कमेंट्सचीही जोरदार चर्चा आहे.6 / 7आला वारा गेला वारा, ताईचा पिक्चर म्हणजे कोरोना सॅनिटायझरचा फवारा...., अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली आहे.7 / 7दुसरी एक कमेंटही खास आहे. खेळायला आवडते पत्त्यात रमी, फोटो पाहून पोर विचारतात हीच का ती संतूरवाली मम्मी...., अशी ही पोस्ट आहे.