Join us  

गोव्याच्या किनाऱ्यावर...! मराठमोळ्या अभिनेत्राचा बीचवर हॉट अंदाज, बिकिनीतील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 6:35 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नेहा महाजन. मराठीबरोबरच हिंदी आणि तमिळ सिनेसृष्टीत अभिनयाचा डंका वाजवणारी नेहा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
2 / 8
नेहाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबत ती पोस्टद्वारे चाहत्यांना अपडेट देत असते.
3 / 8
'कॉफी आणि बरंच काही', 'निळकंठ मास्तर', 'वन वे तिकिट' या मराठी चित्रपटांतून तिने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.
4 / 8
'द पेंटेड हाऊस' या सिनेमातून तिने २०१५ साली मॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नेहा रणवीर सिंगच्या 'सिंबा' चित्रपटातही झळकली होती.
5 / 8
सध्या नेहा गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गोवा व्हॅकेशनचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
6 / 8
नेहाने या फोटोमध्ये प्रिंटेड बिकिनी घातली आहे. हॉट अंदाजातील फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
7 / 8
गोव्याच्या किनाऱ्यावर नेहाचा हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
8 / 8
नेहाच्या या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
टॅग्स :नेहा महाजनसेलिब्रिटी