मनवा नाईकची आईदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'बॉस माझी लाडाची'मध्ये साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 11:02 IST
1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती म्हणजे मनवा नाईक.2 / 9उत्तम अभिनयासह सौंदर्याच्या जोरावर मनवाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मनवाची वरचेवर चर्चा रंगत असते.3 / 9गेल्या काही काळापासून मनवा निर्मिती क्षेत्रात सक्रीय असून तिच्या बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.4 / 9प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री असलेल्या मनवा नाईकची आईदेखील याच क्षेत्रात कार्यक्रत आहे. विशेष म्हणजे त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.5 / 9'बॉस माझी लाडाची' या मालिकेच्या निर्मितीच धुरा मनवाच्या हातात असून या मालिकेत तिची आई मीना नाईक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.6 / 9मनवा नाईकच्या आईचं नाव मीना नाईक असं असून त्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.7 / 9सध्या मीना नाईक बॉस माझी लाडाची या मालिकेत राज्याध्यक्ष मॅडमची भूमिका साकारत आहेत.8 / 9मीना नाईक अभिनेत्री असण्यासोबतच लेखिकास पपेटीअर आणि समाजसेविकादेखील आहेत.9 / 9सध्या मनवा तुमची मुलगी काय करते या मालिकेत डॉ. निलांजना वर्मा ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने मनवाने बऱ्याच वर्षांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.