Join us

अ‍ॅपलची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे किशोरी गोडबोलेची लेक; दिसते आईसारखीच सुंदर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:14 IST

1 / 8
किशोरी गोडबोले हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव. मराठीसोबतच तिने हिंदी मालिकाविश्वही गाजवलं.
2 / 8
'खबरदार', 'फुल ३ धमाल', 'माझा नवरा तुझी बायको' या सिनेमांसाठी ती ओळखली जाते. तर 'मिसेस तेंडुलकर' या हिंदी मालिकेमुळे किशोरी प्रसिद्धीझोतात आली होती.
3 / 8
देखणी, सुंदर, सालस...किशोरीच्या सौंदर्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. किशोरीची लेक सईदेखील तिच्याइतकीच सुंदर दिसते.
4 / 8
सई गोडबोलेने आईच्या पावलावर पाऊल टाकत नुकतंच मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. 'अमायरा' या सिनेमात ती झळकली होती.
5 / 8
आईप्रमाणेच सईदेखील उत्तम गायिका आहे. अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
6 / 8
याशिवाय सई अॅपलची ब्रँड अँबेसिडर आहे. गेल्याच वर्षी तिची नियुक्ती झाली होती.
7 / 8
सई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक रील व्हिडीओ ती शेअर करत असते.
8 / 8
त्यासोबत अनेकदा सई तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. तिचे इन्स्टावर ५ लाख १४ हजार फॉलोवर्स आहेत.
टॅग्स :किशोरी गोडबोलेसेलिब्रिटी