रातोरात 'नॅशनल क्रश' बनली गिरीजा ओक! अभिनेत्रीच्या पतीला पाहिलंत का? मनोरंजन विश्वाशी आहे खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:38 IST
1 / 8सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. कधी एखादं गाणं भाव खाऊन जातं कर कधी नवीन ट्रेंड सुरु होतो. अनेकदा कलाकारांचे फोटो,व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 2 / 8 त्यात आता गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर निळी साडी नेसलेल्या एका मराठमोठ्या अभिनेत्रीचा फोटो तुफान व्हायरल होतो आहे.3 / 8सोशल मीडियावर ट्रेंड मध्ये येणारी ही नायिका म्हणजे गिरीजा ओक.4 / 8लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीमधील तिचा हा लूक व्हायरल होत आहे. स्लिव्हलेस ब्लाऊज, निळी साडी आणि मोकळे केस असा हा तिचा साधा लूक अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.5 / 8 त्यामुळे आता अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक झाले आहेत.6 / 8गिरीजा ओक ही प्रसिद्ध अभिनेता गिरिश ओक यांची मुलगी आहे.तर श्रीरंग गोडबोले यांची ती सून आहे.7 / 8वयाच्या पंधराव्या वर्षापासून ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. गिरीजा ओकने २०११ साली सुहृद गोडबोलेसोबत लग्नगाठ बांधली.या जोडप्याला एक मुलगा देखील आहे.8 / 8सुहृद गोडबोले हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्त्वाचे नाव आहे. ते चित्रपट आणि नाट्यनिर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून कार्यरत आहेत.