1 / 9या फोटोमध्ये मराठीतील दोन प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. फोटोतील या मायलेकी आज मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत. 2 / 9पण फोटोत दिसणाऱ्या या मायलेकी कोण आहेत? तुम्ही त्यांना ओळखलं का? 3 / 9फोटोत दिसणारी चिमुकली जुई भागवत आणि तिची आई दिप्ती भागवत आहेत. 4 / 9अभिनेत्री जुईने आईबाबांच्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत. 5 / 9दिप्ती भागवत हा मराठी सिनेइंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. त्या केवळ अभिनेत्री नाही तर उत्कृष्ट सूत्रसंचालिका, निवेदिका, गायिका तसेच गीतकार आहेत. 6 / 9संगीतकार, गायक मकरंद भागवत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. अनेक नाटक आणि सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. 7 / 9आईप्रमाणेच जुईनेही अभिनयात पाऊल ठेवलं आहे. बालकलाकार म्हणूनच तिने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. 8 / 9'लाइक आणि सबस्क्राइब' या सिनेमातून जुईने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर केदार शिंदेंच्या 'झापुक झुपूक' सिनेमातही जुई दिसली होती. 9 / 9'गुलकंद' सिनेमातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली. जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.